Wednesday, 6 September 2017

माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

चंद्रपूर,दि. 21 ऑगस्ट- सन 2016-17 या वर्षासाठी ऑक्टोंबर अथवा नोव्हेंबर 2017 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणाची छाननी करुन विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येणार आहे.
          नागपूर मंडळाच्या इयत्ता 10वी  व 12वी च्या परिक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा गुण मिळालेल्या पहिल्या पाच माजी सैनिक व त्यांच्या विधवांच्या पाल्यांना एकरकमी 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड नवी दिल्ली येथून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रात प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. यामुळे यासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडावे.  
          जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक व त्यांच्या विधवांनी  सदर पुरस्कार निवडीसाठी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे 15 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे.           
                                                                                                   000

No comments:

Post a Comment