Monday, 11 June 2018

12 जूनला जिल्हातील सर्व बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जवाटप मेळावा

चंद्रपूर दि. 6 जून:  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा सन 2018-19 या खरीप हंगामासाठी  पीक कर्ज देण्याबाबत राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश असून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकांच्या शाखाचा कर्जवाटप मेळावा 12 जून रोजी मंगळवारी 11 ते 5 या काळामध्ये संबंधित शाखांमध्ये घेतला जाणार आहे.
           जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी आज जारी केलेल्या पत्रकामध्ये बँकांच्या मेळाव्याबाबत वेळापत्रक दिले असून जिल्ह्यातील सर्व बँका 12  जून रोजी शेतकऱ्यांना खरिपासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज वाटप करणार आहे. राज्य शासनाने सर्व  बँकांना शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्ती शिवायकोणत्याही प्राधान्यक्रम न लावता मागेल त्याला खरिपासाठी पिक कर्ज देण्याचे स्पष्ट निर्देश  दिलेले आहेत. कोणतीही अट बँकेने लादू नयेयेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज  दिलेच पाहिजे असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
 यासाठीच 12 जून रोजी  सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधित  बँकेच्या शाखेमध्ये हे मेळावे होणार आहेत. सेवा सहकारी संस्थांच्या सभासदबाबत हे मेळावे संबंधित जिल्हा बँकेच्या  शाखेत होणार आहेत. तर राष्ट्रीयकृत,  खाजगी,ग्रामीण बँकेच्या बाबतीत संबंधित बँकेच्या शाखेमध्ये मेळावे होणार आहेत.
 संबंधित शाखेत सर्व  शेतकऱ्यांनी  विविध कागदपत्रांसह तात्काळ संपर्क करावा12 जून  2018 रोजी  शाखा स्तरावर संपूर्ण दिवसभर पिक कर्ज वाटपाबाबत कामकाज करण्याच्या सूचना सर्व बँकांना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तसेच सेवा सहकारी संस्था सभासदांना सुविधा होण्यासाठी संबंधित सेवा सहकारी संस्थेशी संलग्न जिल्हा बँक शाखा या सुटीच्या  दिवशी अर्थात  शनिवार व रविवार 9  व 10  जून रोजी सुरू ठेवण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. आयोजित केलेल्या या मेळाव्याचा शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी  संस्था ज्ञानेश्वर खाडे यांनी केला आहे.
कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत
आता 15  जून पर्यंत वाढवली
शासन निर्णय दि.09/05/2018 अन्वये  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी दि.01/04/2001 ते 31/03/2009 या  कालावधीत  घेतलेले  कर्जक्रेंद व राज्य शासनाच्या सन 2008-9कर्ज माफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकरी तसेच दि.01.4.2001  ते 31/06/2016 या कालावधीत  वाटप केलेल्या  इमुपालनपॉलिहाऊस व शेडनेट चे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी दि.20/5/2018 पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा होता. शासन निर्णय दि.21 मे 2018 अन्वये  सदर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास दि.05 जुन 2018  पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली होती  सदरहू योजना शासन निर्णय दि 5 जुन 2018  अन्वये दि.15 जुन 2018 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे, आवाहन  ज्ञानेश्वर  खाडे जिल्हा  उपनिबंधक सहकारी  संस्थाचंद्रपूर  यांनी  केले  आहे.
0000000000

No comments:

Post a Comment