Friday, 24 April 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी व फळे बाजार नव्या वेळापत्रकानुसार


चंद्रपूरदि.24 एप्रिल: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी भाजी बाजार व फळे बाजार मधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथील भरणारी बाजारपेठ नव्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.
भाजी बाजार व फळे बाजार मधील होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने बाजार समितीने खरेदीदारांना प्रवेशपास देवून मार्केटमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. परंतु,त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच खरेदीदारांची गर्दी होत आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणे बाजार समितीला शक्य होत नाही.त्यामुळे फळे व भाजी बाजार विक्री संबंधाने बाजार समितीने काही  सूचनावेळापत्रक ठरवून दिलेले आहेत.
असे असणार वेळापत्रक:
 भाजीपाला बाजार आठवड्यातील दर सोमवारबुधवार व शुक्रवारला सुरू राहील.तसेच फळे बाजार आठवड्यातील दर मंगळवार,गुरुवार व शनिवारला सुरू राहील.तर फळे व भाजीपाला बाजार रविवारला पूर्णपणे बंद राहील. सदर निर्णय दिनांक 27 एप्रिल पासून म्हणजेच पुढील आठवड्यापासून लागू होईल.  सर्व शेतकरी,भाजी,फळे अडतेव्यापारी व इतर संबंधित घटकांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment