▼

Friday, 8 May 2020

जिल्हा सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 70 लक्ष रुपये जमा; प्रशासनाचे मदतीचे आवाहन

जिल्हा सहाय्यता निधीमध्ये
आतापर्यंत 70 लक्ष रुपये जमा; प्रशासनाचे मदतीचे आवाहन
चंद्रपूर, दि. 8 मे :  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहाय्यता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने जिल्हा सहाय्यता निधीमध्ये चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र कर्मचारी सह. पतसंस्था ऊर्जानगरच्या वतीने रु.1 लक्ष, एम.एस.ई.डि.सी.एल (महावितरण) चंद्रपूरच्या वतीने रु.1लक्ष 57 हजार तर साई आधार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चंद्रपूरच्या वतीने रु. 5 हजाराचा धनादेश देण्यात आला.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र कर्मचारी सह.पतसंस्था ऊर्जानगरच्या वतीने रु.5 लक्ष रुपयाचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.
मदत करायचीय ? या बँक खात्यात पैसे जमा करा !
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment