Saturday, 23 May 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी केली निर्माणाधीन कॅन्सर हॉस्पिटलची पहाणी


जिल्हाधिकाऱ्यांनी केली
निर्माणाधीन कॅन्सर हॉस्पिटलची पहाणी
चंद्रपूर, दि.23 मे: जिल्ह्यामध्ये तयार होत असलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन, कॅन्सर हॉस्पिटलची पहाणी करुन बांधकाम कर्मचाऱ्यांची आरोग्यव्यवस्था यांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी  घेतला.
 जिल्ह्यात तयार होत असलेल्या हॉस्पिटलच्या कामाचा तसेच हॉस्पिटलच्या बांधकामासाठी बांधकाम कर्मचारी यांची आरोग्यव्यवस्था संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सामाजिक अंतर राखत सर्व कामगारांनी काम करावे व कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जावे असे जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी बांधकाम कामगारांसोबत बोलताना सांगितले. तसेच हॉस्पिटलचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे असे मत, देखील जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
टाटा ट्रस्टचे प्रकल्प मुख्य अधिकारी जितेंद्र तिवारी यांनी  कॅन्सर हॉस्पिटल बांधकाम प्रकल्पाची व आरोग्य सुविधेविषयी संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.
यावेळी चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन, कॅन्सर हॉस्पिटलचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.सुमित पांडे, आरोग्य शिबीर व्यवस्थापक सुरज साळुंखे, अभियंता संजय अग्रवाल, प्रसुन गरकोटी प्रामुख्याने उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment