Monday, 22 June 2020

सोनुर्ली येथील 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

सोनुर्ली येथील 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
विहीरीतील मृतदेह जिल्हा शोध बचाव पथकाने काढला बाहेर
चंद्रपूर, दि. 22 जून: जिल्ह्यातील सोनुर्ली तालुका कोरपना येथील विजय शंकर तायडे  30 वर्षीय व्यक्तीने 20 जून रोजी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच दिनांक 21 जून रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाने(पोलीस दल) या व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
21 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती मिळतात त्यानुसार जिल्हा शोध व बचाव पथक (पोलीस दल) चंद्रपूर यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. दुपारी चारच्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह मिळाला. जिल्हा शोध व बचाव पथकाने (पोलीस दल) मृतदेह विहिरीत बाहेर काढला. मृतदेह पोलीस प्रशासनाला सुपूर्त करून पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहेत.
या शोध मोहिमेत बोट चालक अशोक गर्गेलवारमंगेश मत्ते,वामन नक्षीनेउमेश बनकरदिलीप चौहाणगिरीश मारापे, समीर चापलेसुजित मोगरेविकी खांडेकरअजित बाहे उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment