▼

Thursday, 2 July 2020

जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी यांची अध्यापन व्यतिरिक्त इतर कामाकरिता उपस्थितीस परवानगी

जिल्ह्यातील  शिक्षक, कर्मचारी यांची अध्यापन
व्यतिरिक्त इतर कामाकरिता उपस्थितीस परवानगी
चंद्रपूर, दि.2 जूलै:  जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजमधील कार्यालय, कर्मचारी यांची अध्यापन व्यतिरिक्त कामाकरिता जसे ई-लर्निंग कन्टेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीस परवानगी असणार आहे.
याशिवाय कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाद्वारा 15 जून रोजी परिपत्रक जारी झालेले आहे. या परिपत्रकात दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच या संबंधांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. अशी माहिती शुद्धीपत्रकात अपर जिल्हा दंडाधिकारी संपत खलाटे यांनी आदेशित केले आहे.
00000

No comments:

Post a Comment