▼

Tuesday, 29 September 2020

ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 131 उमेदवारांचा सहभाग

 


ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 131 उमेदवारांचा सहभाग

चंद्रपूर,दि. 29 सप्टेंबर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार  व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या  कार्यालयाचा माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. एकूण 131 उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणी केली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड नाशिक प्लांट, पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड नागपूर, पवनसुत मशिनरी अॅन्ड इलेक्ट्रिकल चंद्रपूर या कंपन्यामध्ये अनुक्रमे ट्रेनी, फायनाशियल अॅडव्हायझर, इलेक्ट्रिशियन, या पदासाठी  या तीन कंपन्यांनी  सहभाग  घेतला.

या कंपन्यांमध्ये इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वतःचे  नांव  नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन दिनांक 25 सप्टेंबर, 2020 रोजी वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्यासाठी नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केली.         

000000

No comments:

Post a Comment