Thursday, 3 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 1476 बाधित कोरोनातून झाले बरे


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 1476 बाधित कोरोनातून झाले बरे

गेल्या 24 तासात 222 बाधितांची नोंद तीन बाधितांचा मृत्यू

आतापर्यंतची बाधित संख्या 3167;

उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1656

चंद्रपूर,दि.3 सप्टेंबर: जिल्ह्यात गेल्या 24 तासात 222 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 167 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 1 हजार 656 बाधित आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 476 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वतः आरोग्य तपासणी व नोंदणी करावी. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये आझाद चौकतुकुम चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 28 ऑगस्टला पेंईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 2 सप्टेंबरला पेंईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

तसेच, 48 वर्षीय भानापेठ वार्ड चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 27 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 2 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तरतिसरा मृत्यू हा 52 वर्षीय रहमत नगर चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा आहे. 20 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता. आज 3 सप्टेंबरला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 31तेलंगाणा एकबुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात सर्वाधिक कोरोना बाधित पुढे आले आहेत. 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 115चिमूर तालुक्यातील 4, पोंभूर्णा तालुक्यातील 3, बल्लारपूर तालुक्यातील 7, ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, भद्रावती तालुक्यातील 7, मूल तालुक्यातील 5, राजुरा तालुक्यातील 10, वरोरा तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 40, सिंदेवाही तालुक्यातील 10, कोरपणा तालुक्यातील 3, गोंडपिपरी तालुक्यातील 9 असे एकूण 222 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील रामनगरवडगावसिटीपीएस कॉलनी परीसररयतवारीचिंचाळा एमआयडिसी परिसररामनगर,   नगीनाबागभावसार चौकघुटकाळा वार्डतुकूमबंगाली कॅम्पसमाधी वार्डपठाणपुरा ठक्कर कॉलनी परिसरभिवापुर वॉर्डआंबेडकर नगर बाबुपेठमहर्षी कर्वे चौकसरकार अपार्टमेंट परिसरदडमल वार्डस्वावलंबी नगरओम कृपा अपार्टमेंट परिसरपोलिस क्वॉटर परिसर, बिरसा मुंडा चौकजल नगर वार्डजय हिंद चौक,जटपुरा वार्डछत्रपती नगरगणेश नगर तुकुमविठ्ठल मंदिर वार्डअष्टभुजा वार्डमित्र नगरशक्तिनगरबाबुपेठ वार्डपोलीस लाईन परिसरबालाजी वार्डकोसारामाता नगर परिसरअंचलेश्वर वार्डलालपेठ कॉलनी परिसरभानापेठ वार्ड, बाजार वार्ड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरघुग्घुससरकार नगरगांधी चौकनांदाफाटा इंदिरानगरबिनबा वार्डबिनबा गेट भागातून बाधित ठरले आहेत.

मुल तालुक्यातील गोवर्धनगांगलवाडीकोसंबीताडाळा येथील बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील पाथरीव्याहाड बुज भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील गोकुळ नगर वार्डसंतोषी माता वार्ड परिसरबुद्ध नगर वार्डओल्ड कॉलनी परिसररेल्वे वार्डकन्नमवार वार्ड,भागातून बाधित पुढे आले आहे. पोंभूर्णा येथून वार्ड नंबर 8 परिसरजामखुर्द परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा विकास नगर परिसर तर तालुक्यातील शेगाव,  भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील खांबाडाविरुर स्टेशन परिसरजवाहर नगर परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील डिफेन्स कॉलनी परिसरगौतम नगरराधाकृष्ण कॉलनी परिसरअहिल्यादेवी नगर परिसरडब्ल्यूसीएल कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वडोलीभागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी येथून तारगावहनुमान नगर परिसरगांधीनगर परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील गांधी वार्ड परिसरमासळभागातून बाधित पुढे आले आहे. कोरपणा तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परीसर आवारपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment