Tuesday, 22 September 2020

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे 25 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

 


जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे

25 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

चंद्रपूर,दि. 22 सप्टेंबर: जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर या कार्यालयाचे वतीने दिनांक 25 सप्टेंबरला  पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वतःच्या नावाची नोंदणी करावी.  ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी  युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करावे.

दिनांक 25 सप्टेंबर रोजी वेब पोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावे. उद्योजकांसोबत व्हाट्सअॅपगुगल मिटव्हिडीओ कॉलिंग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment