▼

Saturday, 5 September 2020

पशुधनावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम

 पशुधनावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 5 सप्टेंबर : महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे  7 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता चंद्रपुर येथे दिनांक 15 ते 25 सप्टेंबर असे दोन आठवडे कालावधीचे पशुधनावर आधारित शेळी पालन, दुग्ध  व्यवसाय  व  कुक्कुट  पालन  प्रशिक्षण  कार्यक्रम आयोजित  करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी,  गाय  व कोंबड्यांची  विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन,  औषधोपचार,लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्याचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार जिवनसत्वाचे महत्व,संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतीनी त्वरीत दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं. 9403078773. 07172-274416) तसेच कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment