Monday, 12 October 2020

जातीचे पुरावे व मुळ दस्ताऐवज सादर केले नसल्याने 129 जात वैधता प्रमाणपत्र रद्द


जातीचे पुरावे व मुळ दस्ताऐवज सादर केले नसल्याने 129 जात वैधता प्रमाणपत्र रद्द

चंद्रपूर,दि. 12 ऑक्टोंबर :  30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत निर्गमित केलेले 129 जात वैधता प्रमाणपत्र  रद्द ठरविण्यात आल्याची  माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या तत्कालीन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपुर कडून 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीमध्ये काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. अशा वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सिविल अपील क्रमांक 2723 व 2015 नुसार दिलेले आहे.

वैधता प्रमाणपत्र धारकांना मुळ जात प्रमाणपत्रमुळ जात वैधता प्रमाणपत्रअर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखलावडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीदावा सिध्द करणारे जातीचे व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिवासाबाबतचे महसूली पुरावे (अनुसूचित जातीसाठी सन 1950 पुर्वीचेविमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 1961 पुर्वीचेइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवाराकरीता 1967 पुर्वीचे पुरावे) इत्यादी मुळ दस्ताऐवज व छायांकीत प्रतीसह उपस्थित राहण्याबाबात कळविण्यात आलेले होते.

परंतू,अद्यापही उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचे यापुर्वी निर्गमीत केलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेले या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्र :

7453690269276948698965976599, 6595690969216553, 69447460695969496564,  65616570,6574690565547488,‌ 697365606559749869126565699069956996694665787456749969916026603260427604761276307631763976407642764361256131605160536055606060626063607874687901790279067908760160876018611361437910600660086012601460166019603560407602761876257634764461066110611261166118613761466149607560796080608160896093747474767903730479127455693274806953693660056940694161027457748269776589697865516566695169166594, 6934, 7486745469046915693174976943747969886930 या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्राचा वापर कुठल्याच शासकीय कामाकरीता ग्राह्य धरु नयेअसे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment