Thursday, 15 October 2020

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

 माजी सैनिकविधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

Ø अर्जाची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021

चंद्रपूर,दि.15 ऑक्टोंबर: शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याची तारीख 15 ऑक्टोंबर 2020 अशी कळविण्यात आली होती. परंतुकोविड- 19 च्या वाढत्या प्रादुर्भामुळे शाळा व कॉलेज आजपर्यंत सुरू झालेले नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका व बोनाफाईड सर्टीफिकेट मिळण्यास विलंब होत आहे. या कारणास्तव अर्ज स्विकारण्याची तारीख आता 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

लाभार्थ्यांचा अर्जशिष्यवृत्ती फॉर्मओळखपत्राची छायांकित प्रतबोनाफाईड प्रमाणपत्रउत्तीर्ण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र अर्जासोबत जोडावेत.  पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. तसेच सीईटीजेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहेअशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयप्रशासकीय इमारतपहिला मजलारूम नंबर ३चंद्रपूर येथे संपर्क साधावाअसे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment