Friday, 30 October 2020

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार संधी


 

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार संधी

याबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न

चंद्रपूरदि. 30 ऑक्टोंबर:जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी ऑनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न झाला. सदर वेबिनारचा लाभ ऑनलाईन पध्दतीने देण्यात आला. वेबिनारचे प्रास्ताविक विकास अधिकारी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी वि.बा. गराटे यांनी केले. वेबिनारचे मार्गदर्शक उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी आर.जे मनोहरे हे होते. यांनी यावेळी कृषी क्षेत्रामध्ये पशुपालनकुक्कुटपालनविहिरीवरील मोटारपंप दुरूस्तीकृषी केंद्र चालविणे भाजीपाला विक्री केंद्र चालविणेभाजीपाला विक्री केंद्र सुरू करणे अशा प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगून कृषी क्षेत्रातील विविध योजनेची माहिती दिली.

श्री.मनोहरे यांनी जिल्हा कृषी कार्यालय अंतर्गत चालणाऱ्या योजनांची माहिती तसेच https://mofpi.nic.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती प्राप्त करु शकता असे सांगितले. कृषी क्षेत्रामध्ये रोजगार व स्वयंरोगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे असे मार्गदर्शन यांचेकडून करण्यात आले.

या वेबीनार मध्ये उस्फुर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळाला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यात आलेअसे या वेबिनारचे आयोजक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment