Monday, 9 November 2020

जिल्ह्यात मागील 24 तासात 200 कोरोनामुक्त


 जिल्ह्यात मागील 24 तासात 200 कोरोनामुक्त

केवळ 77 नव्याने पॉझिटिव्ह दोन बाधितांचा मृत्यू

Ø आतापर्यंत 14216 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2554

Ø एकूण बाधितांची संख्या 17024

चंद्रपूरदि. 9 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 200 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 77 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बगड खिडकी येथील 54 वर्षीय पुरुष व पठाणपुरा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 254 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 238, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 77 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 24 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 200 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 216 झाली आहे. सध्या 2 हजार 554 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 633 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 8 हजार 210 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 77 बाधितांमध्ये 43 पुरुष व 34 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 38, पोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील एक,  मुल तालुक्यातील चारगोंडपिपरी तालुक्यातील दोनकोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील पाच,  नागभीड तालुक्‍यातील सातवरोरा तालुक्यातील एक,भद्रावती तालुक्यातील दोनसावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील एकराजुरा तालुक्यातील तीनगडचिरोली पाचयवतमाळ व तेलंगाणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 77 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील साईबाबा वार्डनगीना बागओम नगरपंचशील चौकवडगावऊर्जानगरगाडगे बाबा चौकनानाजी नगरजल नगर वार्डकोसारासिस्टर कॉलनी परिसरभिवापुर वॉर्डश्रीराम वार्डबाबुपेठविद्यानगरघुटकाळा वार्डतुकूमएकोरी वार्डसरकार नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील रामनगर कॉलनी परिसर ,कोहपरा भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बालाजी वार्डशिवाजीनगरदेलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील राम मंदिर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा कोंढापरिसरातून बाधित पुढे आले आहे.

 

सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपुर भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडवचावडेश्वरी मंदिर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील  वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 10 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील  सुकवाही भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000


No comments:

Post a Comment