Thursday, 5 November 2020

नागरी सेवा क्रीडा स्पर्धेकरिता अर्ज आमंत्रित

 नागरी सेवा क्रीडा स्पर्धेकरिता अर्ज आमंत्रित

1 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.5 नोव्हेंबर: केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. केंद्रीय नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा  राज्य शासनाच्या वतीने त्या त्या राज्यांमध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहे.

राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्याच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांना टेबल टेनिसबॅडमिंटनफुटबॉलहॉकीक्रिकेटव्हॉलीबॉलजलतरणबास्केटबॉलब्रिजकॅरमबुद्धिबळॲथलेटिक्सलघुनाट्यकबड्डीवेटलिफ्टिंगपावर लिफ्टिंगशरीर सौष्ठवकुस्तीलॉन टेनिसनृत्य संगीत या खेळ प्रकारात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथून प्राप्त करून कार्यालय प्रमुखविभाग प्रमुख यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्याकडे प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगवेगळे असे दोन प्रतींमध्ये या कार्यालयात दि. एक डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके मो.क्र.9975862469 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  अब्दुल मुष्ताक यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment