Friday, 12 February 2021

जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपाला



 जिल्हा परिषदेत आता मिळणार ताजा भाजीपाला

पंचायत राज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या हस्ते मार्टचे दघाटन

 

 

चद्रपूर दि. 11, : उमेद अभियानाच्या वतीने चंद्रपू जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट अंतर्गत भाजीपाला   शेतमाल उत्पादन विक्री केंद्राचे आज  पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी इतर समिती सदस्यांसह आमदा किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, प्रकल्प संचालक शंकर किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते.

उमेद अभियानातील स्वंयसहायता समुहांना अधिकाधिक बाजारपेठ मिळावी, यासाठी ठिकठिकाणी   समुह संचालित मार्ट सुरू करण्यावर अभियानाचा भर आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वयंसहायता  समुहांच्या महिलांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला कर्मचारी तसे सर्वसामान्य नागरिकांना मिळावा,  यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्ट मध्ये ताजा भाजीपाला उपलब्ध करुन देण्‍यात येणा आहे.

 चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उमेद अभियानातील स्वयंसहायता समुहांची उत्पादने येथे विक्री केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, संदीप घोंगे, गजानन  भिमटे, नरेंद्र नगराळे, प्रफुल् भोपळे, प्रवीण फुके, सोनल जांभुळकर यांनी सहकार्य केले.

0000

No comments:

Post a Comment