Friday, 12 February 2021

पोंभुर्णा तालुक्यातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा

 पोंभुर्णा तालुक्यातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा

  चंद्रपूर, दि. 12 फेब्रुवारी :   पोंभुर्णा तालुक्यात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाला खा. सुरेश धानोरकर व विधानमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार हे विशेष अतिथी म्हणून तर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

            लोकार्पण सोहळ्यात पोंभूर्णा येथील तालुका क्रिडा संकुल, गावतलावाचे सौंदर्यीकरण, जीम हॉल व श्री. राजराजेश्वर देवस्थान येथे सभागृह व परिसराचे सौंदर्यीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे. लोकार्पण सोहळा दु. 12 ते 1.30 दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.रा.भास्करवार, जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक, पोंभुर्णा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी कळविले आहे.

0 0 0

No comments:

Post a Comment