Monday, 8 February 2021

ठेवींची उचल न केलेल्या डाक खात्यांची माहिती जाहीर


 ठेवींची उचल न केलेल्या डाक खात्यांची माहिती जाहीर

 चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी :   डाकघर आणि बॅकातील खातेदारांनी 10 वर्षापूर्वी मुदत संपलेल्या परंतु ठेवीची उचल न केलेल्या खात्यातील रक्कमेची हाताळणी करण्यासाठी भारत सरकारने सीनियर  सिटीझेन वेल्फेअर फंड-2016 हे नियम  बनविलेले आहेत. या नियमांच्या अनुंषगाने अश्या मुदत संपलेल्या परंतु रक्कमेची उचल न केलेल्या खात्याची माहिती ही जनजा‍हीर करायची आहेत.

त्या अनुअषंगाने भारतीय डाक विभागाने www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर अश्या खात्याची महिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक डाकघरांना अश्या खात्याची माहिती कार्यालयाच्या दर्शक फलकावर लावण्याबाबत व तसेच इतर मार्गानीसुध्दा याचे प्रसारण करण्यासाठी निर्देशित केले आहे. या नियमाबद्दल अधिक माहितीसाठी जवळील डाक कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

0 0 0 0

No comments:

Post a Comment