Wednesday, 14 September 2022

राष्ट्रीय जल पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन

 

राष्ट्रीय जल पुरस्कारात सहभागी होण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 14 सप्टेंबर : 4 था राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी शासनाद्वारे कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने, राज्यातील जिल्हे, ग्रामपंचायती, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, विनिर्दिष्ट संस्था, कार्पोरेट तसेच व्यक्तींनी या पुरस्कारात सहभाग नोंदवावा. जेणेकरून जलसंधारणातील उत्कृष्ट कामांना पुरस्कृत करण्यासाठी राज्याचा जास्तीत जास्त सहभाग होऊ शकतो.

पुरस्काराच्या श्रेणीची यादी आणि इतर संबंधित माहिती राष्ट्रीय पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रवेशिका प्राप्त करण्याची अंतिम तारीख दि. 15 सप्टेंबर 2022 असून अधिक माहितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

०००००


No comments:

Post a Comment