Wednesday, 28 September 2022

सामाजिक न्याय भवन येथे तृत्तीय पंथीयाकरीता शिबिराचे आयोजन


सामाजिक न्याय भवन येथे तृत्तीय पंथीयाकरीता शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर :      राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे  वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हायातील  सर्व तृत्तीय पंथीयाकरीता शिबिराचे  आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये आलेल्या तृत्तीय पंथीयांना केंद्र शासनाच्या पोर्टलवर  माहिती  भरून देण्यात आली व शिबिरामध्ये आधार कार्ड, राशन कार्ड व इलेक्शन कार्डाचे स्टॉल लावण्यात आले होते. या अभियानाप्रसंगी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यायातील अधिकारी व सर्व समाजकल्याण निरीक्षक तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment