Tuesday, 11 October 2022

कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार

 

कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार

Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी आयोजन

चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील राज्य शासकीय सेवानिवृत्तीधारकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चौथा माळा, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार आहे.

तसेच निवृत्तीवेतन प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने 17 ऑॅक्टोबरला सकाळी  11 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८० वर्षावरील ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सदर लाभ मिळालेला नाही, अशा निवृत्तीवेतन धारकांनी येतांना त्यांचे जन्म तारखेची नोंद असल्याबाबचा पुराव्यासह उपस्थित राहवे. जेणेकरून त्यांना शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात येणारे वाढीव दराने निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

तरी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे निवृत्ती वेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आपल्या अडचणी सोडवण्याचे दृष्टीने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रफूल्ल वडेट्टीवार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment