Tuesday, 29 November 2022

समता पर्वनिमित्त पत्रकारांसाठी 30 नोव्हेंबरला कार्यशाळा

 

समता पर्वनिमित्त पत्रकारांसाठी 30 नोव्हेंबरला कार्यशाळा

चंद्रपूर दि.29: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 पर्यंत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय भवन येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचा विषय सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा असा आहे.  

या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment