Tuesday, 20 August 2024

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Ø विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षणार्थी नेमणूक

Ø मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 20 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय/ निमशासकीय आस्थापनाखाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगसहकारी संस्थासामाजिक संस्थासेवा क्षेत्रांतर्गत खाजगी / सार्वजनिक आस्थापना/ कंपन्या/ उपक्रम / संस्था येथे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्याकरीता 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 1) 12 वी पास विद्यार्थांना प्रतिमाह विद्यावेतन  6 हजार रुपये2) आय टि आय / पदवीधर प्रतिमाह विद्यावेतन 8 हजार तर 3) पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थांना प्रतिमाह 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार  आहे.

करीता 12 वी पासआय टी आयकोणत्याही शाखेची पदवीका कोणत्याही शाखेचा पदविधर / पदव्युत्तर उमेदवारानी त्यांचे शैक्षणिक पात्रता सिध्द करणा-या मुळ प्रमाणपत्रासह वेळेवर उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment