Wednesday, 28 August 2024

वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे होणार निवारण

 

वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे होणार निवारण

Ø  पालकमंत्री कार्यालयात निवेदन सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 28:  जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विनंतीनुसारकेंद्रीय कोयला तथा खान मंत्री जी. किशन रेड्डी यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांचे असलेले विविध प्रश्न व तक्रारीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन नियोजन भवनचंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगानेनागरिकांना वेकोली (WCL) संदर्भात असलेल्या तक्रारीबाबत काही निवेदने द्यावयाची असल्यास पालकमंत्री कार्यालयाचे 9552799608 या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर अथवा पालकमंत्री कार्यालयनियोजन भवन येथील प्रशांत खर्डीवार यांच्याकडे सादर करावीत.असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.

००००००

No comments:

Post a Comment