Tuesday, 24 September 2024

मधमाशापालन योजनेकरीता व्यक्ती / संस्थांकडून अर्ज आमंत्रित

 

मधमाशापालन योजनेकरीता व्यक्ती / संस्थांकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 24 :    महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत  झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती कडून / संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेची वैशिष्टे : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षणसाहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्व- गुंतवणूक शासनाच्या हमीभावने मध खरेदीविशेष छंद प्रशिक्षणाची सुविधामधमाशा संरक्षण व सर्वधनाची जनजागृती

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता : 1. वैयक्तीक मधपाळ करीता अर्जदार स्वाक्षर असावास्वताची शेती असल्यास प्राधान्यवय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 2. केंद्रचालक प्रगतशिल मधपाळ करीता किमान 10 वी पासवय 21 वर्षापेक्षा जास्त असावेव्यक्तीच्या नावे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती/जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी. मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 3. केंद्र चालक संस्थेकरीता संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेचे नावे अथवा भाडेतत्वावर  घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मधउत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमताअसलेली सेवा असावी.

 

अर्टी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करणे आणि संबंधित मंडळास बंद पत्र  लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीकरीता संपर्क :  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारीमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळउद्योग भवनदुसरा माळाबस स्टॅन्ड समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपूरमोबाईल क्रमांक 9373287057 / 9322789232 यावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment