▼

Wednesday, 18 September 2024

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्प शिबीराचे आयोजन

 

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्प शिबीराचे आयोजन

चंद्रपूर, दि 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

येथे होणार शिबीर : 1) 23 सप्टेंबर रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 2) 24 सप्टेंबर रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 3) 25 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर 4) 26 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी  5)  27 सप्टेंबर 2024 रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर    

वरील दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन नियुक्ती कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल, याची नोंद चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment