Tuesday, 8 October 2024

आता व्हाट्सअप वर शासनाच्या विविध योजनांची माहिती 24 तास उपलब्ध

 आता व्हाट्सअप वर शासनाच्या विविध योजनांची माहिती 24 तास उपलब्ध

Ø जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

चंद्रपूरदि. 8 : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर 24 तास उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हाट्सअप चाटबोर्ड क्रमांक 94 22 47 57 43 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहितीत्याचे फायदेअर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

अशी आहे राबविण्यात येणारी प्रक्रिया : संभाषण सुरू करण्यासाठी Hi टाईप करा. कृपया भाषा निवडा. योजनांची माहिती मिळण्यासाठी या योजनेचा क्रमांक टाईप करा. जसे1. मुख्यमंत्री वयोश्री योजना2. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना3. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना4. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना5. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना6. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना8. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना9. आयुष्यमान भारत योजना10 स्वच्छ भारत अभियान11. दीनदयाल अंत्योदय योजना12. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना13. किसान क्रेडिट कार्ड योजना14 खेलो इंडिया15. जनधन योजना16. जीवन ज्योती विमा योजना17. सुरक्षा बीमा योजना18. अटल पेन्शन योजना19 पीएम मुद्रा प्रधानमंत्री20. प्रधानमंत्री आवास योजना21. प्रधानमंत्री पोषण अभियान.

असा होणार नागरिकांना लाभ : 24 बाय 7 सेवा उपलब्धतत्पर प्रतिसादउत्तरांमध्ये सातत्यमानवी मदतीशिवाय ऑर्डर दिली जाऊ शकतातवैयक्तिकरणएकाच वेळी अनेकांशी संवाद साधने शक्यवेळेची बचतआधुनिक एपीआय मुळे समाकलित करणे सोपे.

००००००

No comments:

Post a Comment