Thursday, 26 December 2024

27 डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप कार्यक्रम

 

27 डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत

लाभार्थ्यांना सनद वाटप कार्यक्रम

Ø जिल्ह्यातील 82 गावांत विशेष शिबिराचे आयोजन

        चंद्रपूर दि. 26 : गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे हक्क आणि प्रापर्टी कार्ड देण्यासाठी मालकी हक्काची महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना सनद वाटप योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे 27 डिसेंबर 2024 रोजी होणार आहेस्वामित्व योजने अंतर्गत देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. 

            शासनाकडून जिल्हास्तरावर तसेच गावात सनद कॅम्प घेण्याचे निर्देश प्राप्त आहेतत्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सदर योजनेमधील 50 लाभार्थ्यांना प्रातनिधीक स्वरुपात खासदारआमदार यांच्या हस्ते सनद वाटपाचा कार्यक्रम सकाळी  11 वाजता नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालय परिसरचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात संबंधित लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील 82 गावांत कॅम्प आयोजित करण्यात आले असून तिथे शासकीय अधिकारीकर्मचारी यांच्या माध्यमातून सनद वाटप होणार आहे.

तरी सदर योजनेचा लाभ घेऊन आपल्या मालकी हक्काचे जतन करणारी सनद प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख भूषण मोहिते यांनी केले आहे.

स्वामित्व योजनेचे फायदे  : 1. अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमापनकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे. 2. सीमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील. 3. मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी, 4. कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, 5. जमिनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण, 6. मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ आणि 7. गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना

००००००

No comments:

Post a Comment