Saturday, 4 January 2025

रस्ता सुरक्षा अभियान- 2025 पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

 




रस्ता सुरक्षा अभियान- 2025

पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

चंद्रपूरदि. 04 : राज्यात 01 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत 36 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुशंगाने जिल्हयातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावेरस्ते अपघातास आळा बसावारस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावीनिर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावायासाठी 3 जानेवारी रोजी वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयचंद्रपूर येथून रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यात रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश देण्यात आला.

तसेच 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त सदर जनजागृती रॅलीमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणामसायबर सुरक्षा व उपाययोजनापोक्सो कायदानायलॉन मांजाचा वापर न करणेबाबतसुध्दा जनजागृती करण्यात आली.

 जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान व पोलिस स्थापना दिवस जनजागृती फेरीमध्ये पोलिसशहरातील तरुण मुलेमुली व शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्व समजावून देण्यात आले. यात सरदार पटेल महाविद्यालयचंद्रपूर आणि इतर शाळा/महाविद्यालयातील  विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सहभाग घेतला. सदर रॅली वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर ते प्रियदर्शनी चौक आणि परत वाहतूक नियंत्रण शाखा येथे समारोप करण्यात आला.

 यावेळी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे,  परिविक्षाधीन उपअधिक्षक प्रमोद चौगुले यांनी हिरवी झेंडी दाखवून फेरीची सुरुवात केली. सदर प्रसंगी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार पाटीलमोटार परिवहन निरीक्षक विशाल कसंबेसहायक मोटार वाहन निरीक्षक अमानुल अंसारीअंशुल मुर्दिवसुरज मुन व दंगा नियंत्रण पथकवाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.

०००००००

No comments:

Post a Comment