Wednesday, 8 January 2025

लाभार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी प्रेरित करणाऱ्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

लाभार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी प्रेरित करणाऱ्या बेकरी  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

            चंद्रपूरदि. 08 : महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र (MCED)  यांच्यात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजनाअमृत- आयात निर्यात प्रशिक्षण योजनाआणि अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक बी.टी .येशवंते यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

              उद्योग क्षेत्राची  कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण  उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. त्यामुळे  अमृत लक्षित ( ब्राम्हणबनियाबंत्सकम्माकायस्थकोमटी ऐयांगरनायरनायडूपाटीदारबंगालीपटेलराजपूतयेलमारमारवाडीठाकूरत्यागीसेनगूनथरवैश्यराजपूरोहित,  गुजराथी) गटातील  युवकयुवतींमध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण  व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेऊन अमृत संस्थेने हे महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे.

अमृत संस्थेच्या सोलर पी.व्ही.इंस्टॅालेशनआयात-  निर्यात आणि अमृत बेकरी प्रशिक्षण योजना या तिन्ही निवासी प्रशिक्षण योजनांचा कालावधी 18 दिवसांचा आहे. यात १८ दिवसांचा आहे. यात 80 टक्के तांत्रिक प्रशिक्षण व 20 टक्के उद्योजकता विकास  यावर भर देण्यात येईल. या योजनेत फक्त तांत्रिक ज्ञानच मिळणार नसून उद्योग उभारणीकरिता मदत दिली जाईल. खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा प्रशिक्षणाचा खर्च व प्रशिक्षण कालावधीतील निवासभोजन व्यवस्था अमृत संस्थेमार्फत केली जाणार असल्याने अधिकाधिक युवक-युवतींनी उद्योजकतेचे  स्वप्न साकार करण्यासाठी अमृत योजनेच लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत व इमसीईडी संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

             अमृत  संस्थेच्या योजनेचा लाभ घेत आपल्या उद्योजकतेला नवी ओळख देण्यासाठी इच्छुकांनी 14 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योगभवन बस स्टॅन्ड समोरचंद्रपूर येथे किंवा संदीप जाने (मो.क्र. 9637536041)निनाद रामटेके (मो. क्र. 8605075370) मिलींद कुंभारे (मो.क्र. 9011667717) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प संचालक संदीप जाने यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment