Friday, 28 March 2025

उपरवाही येथील शाळेला जिल्हाधिका-यांची भेट

 



उपरवाही येथील शाळेला जिल्हाधिका-यांची भेट

Ø विद्यार्थ्यांसोबतही संवाद

चंद्रपूर, दि. 28 मार्च : 100 दिवस कृती आराखडयाअंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  आठवडयातून किमान दोन दिवस  क्षेत्रीय भेटी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

 ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ टप्पा-2 सन 2024-25  अंतर्गत जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या शाळेत नाविन्यपूर्ण ‍विज्ञान व गणित प्रयोगशाळेतुन शिक्षण, इकोक्लब सदस्यामार्फत पर्यावरण जागृती व संरक्षण, मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पथकाद्वारे सादरीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उपक्रम, बाल  वाचनालय नियमित वापर, सावित्रीबाई फुले बचत बँकेच्या माध्यमातुन आर्थिक देवाण घेवाण, विपुल भारत अंतर्गत माता-पालक गटाची स्थापना व गट कार्यरत, आशा व अंगणवाडी सेविका मार्फत किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन,  निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्यात येतात.

यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेत सुरु असलेल्या  प्रशंसनीय उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुकसुध्दा केले. भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखाडे, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी  आदी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment