Tuesday, 18 March 2025

जेईई / नीट परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा


 

जेईई / नीट परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मार्चपर्यंत

चंद्रपूर, दि. 18 मार्च : खाजगी  तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे  जे विद्यार्थी मार्च 2025 मध्ये 10 वीच्या परिक्षेत बसलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी (जेईईव वैद्यकीय (नीटप्रवेश परिक्षेची पूर्व तयारी करून घेण्याकरिता नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने पूर्व तयारी  घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश पूर्व चाळणी परिक्षा मे 2025 मध्ये आयोजन करण्यात येईल.

त्यासाठी 1. आवेदन करणारा विद्यार्थी हा अनुसूचित / आदिम जमातीचा असावा. 2. ‍विद्यार्थी हा चिमुर प्रकल्प कार्यालयअंतर्गत येत असलेल्या (चिमुरवरोराब्रम्हपुरीनागभिड व भद्रावती) तालुक्यातील असावा. 3.  पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लक्ष पेक्षा कमी असावे.

शासकीय/ खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत अनुसूचित जमातीचे प्रवेशित असलेले विद्यार्थ्यांमधून नागपूर विभाग स्तरावर 12 विद्यार्थी निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या निवडी करिता चाळणी परिक्षा घेतली जाईल. सदर चाळणी परिक्षेची प्रश्नपत्रिका राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याकरीता निवड होणाऱ्या कार्यान्वित संस्थेमार्फत प्रश्नपत्रिका तयार केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी चाळणी परीक्षेमधील प्राप्त गुणास 50 टक्के  भारांक व इत्यादी 10 वी बोर्ड परीक्षेत  प्राप्त गुणांच्या 50 टक्के  भारांक याप्रमाणे गुणानुक्रमे व अंतिम गुणवत्ता यादी  व प्रतिक्षा यादी अपर आयुक्त स्तरावरून मंजुर करण्यात येईल. 

प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांने प्रकल्प कार्यालयचिमूर येथे संपर्क करावा. आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम मुदत 30 मार्च 2025 आहे. तसेच परिक्षेचा दिनांक व स्थळ वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कळविण्यात येईल, असे चिमूर प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment