Wednesday, 2 April 2025

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ


 आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ

            चंद्रपूरदि. 2 एप्रिल :  आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे सन 2025-26 मधील पहिल्या बॅचचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा कौशल्य विकास व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री  वाघमारे यांनी सन्मानचिन्ह योजनादर्शिका व माहिती पुस्तिका देऊन उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. पवार म्हणाले, उमेदवारांनी अभ्यासाची तीव्र इच्छानिश्चीत ध्येयप्रयत्नात सातत्यकठीण परिश्रमपरिस्थितीची जाणीव ठेवून वाटचाल करावी. तसेच आपले ध्येय साध्य करावे. प्रास्ताविकात श्रीमती वाघमारे यांनी कार्यालयाची माहितीप्रशिक्षणाचा उद्देश तथा स्पर्धा परिक्षाबाबतचे महत्व याबाबत माहिती दिली

           कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी नवीन बॅचच्या उमेदवारांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

No comments:

Post a Comment