Friday, 25 April 2025

आदिवासी व ग्रामीण तरुणांसाठी आदरतिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण


 

आदिवासी व ग्रामीण तरुणांसाठी आदरतिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 25 एप्रिल पंतप्रधान यांच्या स्किल इंडिया मिशनशी सुसंगत राहून चंद्रपूर वन अकॅदमीने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हाऊसकीपिंग व फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सेवा या आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहेया अनुषंगाने प्रथम या राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

या करारावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एमश्रीनिवास रेड्डी यांनी स्वाक्षरी केलीत्यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 60 दिवसांचा असून प्रशिक्षणनिवासभोजन व नोकरीची व्यवस्था याचा संपूर्ण खर्च अकादमी आपल्या आंतरिक निधीतून करत आहेही योजना वनालगताच्या गावातील तरुणांना सक्षम बनवतेतसेच पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन वनसंवर्धनालाही हातभार लावते.

मेलघाट व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांतील 12 तरुणांचा आठवी हाउसकीपिंग बॅच 20 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर अकॅदमीत उपस्थित होतीआतापर्यंत हाऊसकिपिंग बॅचेस मध्ये एकूण 110 तसेच फूड आणि बेवरेज मधील एकूण 99 जणांना यशस्वीरित्या प्रशिक्षण करून थ्रीफोरफाईव्ह स्टार हॉटेल्सरिझॉर्टमध्ये नोकरी देण्यात आली आहेतसेच  हाउसकीपिंग सहाय्यकाचे  दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना उदयपूरलोणावळाताडोबाचंद्रपूर या ठिकाणी जॉब प्लेसमेंट देण्यात आलेया प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक एस केगवळी  यांच्या हस्ते प्रशिक्षण  प्रमाणपत्रजॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात करण्यात आले व नेमणूकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले.

चंद्रपूर वन अकादमी मार्फत हा कार्यक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्याशी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी समझोता केला असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या पाच कौशल्य कामासाठी जसे कीफोर व्हीलर टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रिशियनवेल्डरहॉस्पिट्यालिटी असिस्टंट व मल्टी फंक्शन ऑफिस असिस्टंट आणि  ब्युटीशियन अशा कौशल्य कामी प्रशिक्षण देण्यात येणार आहेसदरचे प्रशिक्षण महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. तरी त्याचा फायदा सर्व संबंधित गावातील तरुणांनी घ्यावा,असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment