Monday, 28 April 2025

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्या

 विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्या

Ø प्रादेशिक उपसंचालकांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांना सूचना

      चंद्रपूर,दि, 28 एप्रिल :  विजाभज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर द्यावाअशा सूचना इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

           श्री. वाकुलकर यांनी विभागातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील विजाभज आश्रम शाळेतील मुख्याध्यापकसंस्थाचालक व कर्मचाऱ्यांची नुकतीच चंद्रपूर येथे आढावा बैठक घेतलीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी सहाय्यक संचालक आशा कवाडे उपस्थित होत्यायावेळी श्री. वाकुलकर यांनी मुख्याध्यापकसंस्थाचालक व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मान्यता संख्येनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावातसेच कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीव डीसीपीस याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेतसेच अनुकंपाधारकांनी प्रस्तावातील त्रुटी दूर करुन 30 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याबैठकीला संस्थाचालकमुख्याध्यापकशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment