Friday, 23 May 2025

26 मे रोजी समाज कल्याण विभागाच्या तक्रारी संदर्भात लोकशाही दिनाचे आयोजन


 26 मे रोजी समाज कल्याण विभागाच्या तक्रारी संदर्भात लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर,दि. 23 मे :   समाज कल्याण आयुक्तालयमहाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसाच्या कृती आराखड्याचे आयोजन केलेल आहे. त्या अनुषंगाने महिन्यातील शेवटच्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असून सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण  कार्यालयात असलेल्या योजनाबाबत काही तक्रारी असल्यास ते लोकशाही दिनामध्ये सादर करण्यात यावेजेणेकरुन त्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

त्यानुसार सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण  कार्यालयात सोमवार दि. 26 मे 2025 रोजी दुपारी  12 वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे. तरी चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेनी या लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या तक्रारी असल्यास सादर कराव्यात,  असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment