Wednesday, 25 June 2025

5 व 6 जुलै रोजी कारागृहातील दर्गा भाविकांसाठी खुला


 व जुलै रोजी कारागृहातील दर्गा भाविकांसाठी खुला

चंद्रपूर,दि 25 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात  पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीस्थळी दरवषीप्रमाणे यावर्षी  मोहर्रम सणानिमित्त व जुलै रोजी भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स (यात्राआयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता सर्व समाजातील भाविक दर्शनासाठी येत असतातत्यामुळे सदर कालावधीत कारागृहाच्या आतील समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार आहेकारागृहाचे आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोनकमेराखाद्यपदार्थ उदापेढेबर्फी  अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आले आहे. तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल. नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे  व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कारागृहाचे प्रभारी अधिक्षक सतिश सोनवणे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment