Wednesday, 4 June 2025

9 जून रोजी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप

 

जून रोजी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप

चंद्रपूरदि. 4 जून : शिबिरातील तपासणीअंती जिवती तालुक्यातील पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरीक लाभार्थ्यांना जून 2025 रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहेभारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्कोयांच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील दिव्यांग  व जेष्ठ नागरिकांसाठी 30 नोव्हेंबर 2023 रोजी  आणि 30 मे 2025 रोजी तपासणी शिबीर घेण्यात आलेया दोन्ही शिबिरातील एकूण पात्र 413 लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप होणार आहे.

सदर योजनेतंर्गत ट्रायसायकलव्हीलचेअरबॅटरीवर चालणारी ट्रायसायकलक्रचेसवॉकिंग स्टीकरोएटरसीपी चेअरबीटीई हिअरींग एडवॉकरस्टीकबेल्टस्पायनल सपोर्टसर्व्हाइकलकेनस्लेटकिट व इतर उपकरणे दिव्यांग व वृध्द लाभार्थ्यांना मिळणार आहेतजिवती तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी 413 पात्र लाभार्थ्यांना योजनेमधून दिव्यांग व 60 वर्षावरील वृध्द व्यक्तींसाठी लागणारे सहाय्यक उपकरण साहित्याचे वाटप जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉअशोक ऊईकेयांचे  हस्ते करण्यात येईल.

सदर कार्यक्रम गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल अॅन्ड लॉनयेथे नियोजित केला आहेतरी सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment