Tuesday, 3 June 2025

जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी






 

जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी

चंद्रपूरदि. 3 जून : राज्य शासनाने वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.3) वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्रीगौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणी आदीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केलेतसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिलीरोजगार हमी योजनेतून वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र,  कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्पनगर परिषद वरोरा व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेले वरोरा शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळेतहसीलदार योगेश कौटकरनगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकीकनिष्ठ अभियंता श्रीखणकेवन परिक्षेत्र अधिकारी श्रीशेंडे , मंडळ कृषी अधिकारी श्रीकाळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

भद्रावती तालुक्याला सुध्दा भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिलीतसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केलीभद्रावती तालुक्यातील मौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची यावेळी त्यांनी पाहणी केली.

            फोटो कॅप्शन : विविध विकास कामांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा.

००००००

No comments:

Post a Comment