Wednesday, 25 June 2025

आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन





आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

Ø प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले

चंद्रपूरदि. 25 : देशातील आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावेया उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयचंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहेया प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,  जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी : पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्थालोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोणलोकशाहीचे तत्वभारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासनग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्थास्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणालीआणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्थाआणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्रप्रसारमाध्यमांवरील निर्बंधसरकारच्या विरोधात जनआंदोलनआणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊलेचंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढाआदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप : आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेयात हेमंत वासुदेव डहाकेगिरीश वासुदेवराव अणेअनिल मधुकर अंदनकरसुधीर वसंतराव टिकेकरनारायण कृष्णराव पिंपळापुरेकृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता.

००००००

No comments:

Post a Comment