Thursday, 19 June 2025

शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभुमीवर गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांची कार्यशाळा

 

शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभुमीवर गटशिक्षणाधिकारीकेंद्रप्रमुखांची कार्यशाळा

Ø शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार

चंद्रपूरदि. 19 : जि.शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  शैक्षणिक गुणवत्तेचे ध्येय ठेवून सन 2025-26 या शैक्षणिक सत्राची सुरवात 23 जून 2025 पासून होत आहेत्या अनुषंगाने सर्व गटशिक्षणाधिकारीकेंद्रप्रमुख यांची कार्यशाळा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल घेण्यात आलीयावेळी शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहशिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकरराजेश पाताळे (माध्य.), उपशिक्षणधिकारी विशाल देशमुखशिक्षण विस्तार अधिकारी अर्चना मासीरकरशुभांगी पिनदूरकरलेखाधिकारी राजेंद्र बुर्लाबार यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीसिंह यांनी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताशिष्यवृत्ती प्रगतीनिपुण भारत अभियान या विषयी मार्गदर्शन केलेतसेच विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक  शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ‘वाघांच्या गोष्टी’ या प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आलाअशा विद्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.  

याप्रसंगी शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी शाळा प्रवेशोत्सवखासदार-आमदार शाळा भेटीशाळा भेटकेंद्रप्रमुखांच्या जबाबदाऱ्याबांधकामशिष्यवृत्ती परिक्षा  उपस्थिती, 25 टक्के पटसंख्या वाढविणे याबाबत मार्गदर्शन केलेराजेश पाताळे यांनी वरील घटकांसोबतच कार्य करताना बाह्यप्रेरणेपेक्षा अंतः प्रेरणा जागवून कार्य करावे असे सांगितलेमोफत गणवेश योजनामोफत पाठ्यपुस्तक योजनाशाळाबाह्य विद्यार्थी  वाहतूक सुविधाविद्यार्थी सुरक्षाशाळा अनुदान याविषयी उपशिक्षणधिकारी विशाल देशमुख यांनी माहिती दिली.

कार्यशाळेचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी केलेसंचालनविवेक इत्तडवार तर आभार शुभांगी पिजदूरकर यांनी मानलेयावेळी सर्व गटशिक्षणाधिकारीकेंद्रप्रमुखमुख्याध्यापकशिक्षक उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment