Monday, 9 June 2025

सर्वांना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणार




 

सर्वांना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणार

Ø पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

चंद्रपूरदि. 9 जून : जिल्हा नियोजन समितीचा निधी हा विकासाच्या कामासाठी उपयोगात आणला जातोया निधीचे वितरण करताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच वाटप करण्यात येईलतसेच जिल्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईलजेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावेअसे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी सांगितले.

नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होतेबैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकरडॉनामदेव किरसानआमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारआमदार सर्वश्री सुधाकर अडवालेअभिजीत वंजारीकिशोर जोरगेवारकीर्तीकुमार भांगडीयाकरण देवतळेदेवराव भोंगळेजिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगपोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शनजिल्हा नियोजनअधिकारी संजय कडू तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सन 2024 - 25 मध्ये सर्वसाधारण योजनेचे 456 कोटीआदिवासी उपयोजनेचे 103 कोटीअनुसूचित जाती उपयोजनेचे 75 कोटी असे एकूण 634 कोटी 42 लक्ष निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहेअसे सांगून पालकमंत्री डॉअशोक उईके म्हणालेआरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उपकेंद्रासाठी निधी दिला जाईलतसेच अद्यावत सोयी सुविधा या केंद्रामधून देण्यात येईलत्यासाठी विशेष प्रस्ताव पाठवावाजिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आवर्जून पूर्ण करावेनगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना सुद्धा निधी देण्यात येईल.

ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित राहू नयेत्यासाठी जिल्ह्याचा एक चांगला प्रस्ताव तयार करावासर्व तालुका स्तरावर क्रीडा विकासासाठी आणि व्यायामशाळांसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहेकर्मवीर मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ग्रामीण भागात औषधींसाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह मोफत घरी नेण्यासाठी शववाहिकांची संख्या वाढवावीजिल्ह्यातील ’ आणि ’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना सुध्दा निधी देण्यात येईलसर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या निधीचे वाटप करण्यात येईलअशी ग्वाही पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी दिलीतसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर असतीलत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यायावेळी खासदार आणि आमदारांनीसुद्धा आपापल्या सूचना मांडल्या.

राजशिष्टाचारानुसारच विकासकामांचे लोकार्पण व्हावे : शासनाच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण होत असतांना ते राजशिष्टाचारानुसारच व्हावेलोकप्रतिनिधींची नावे कोनशिलेवर टाकावीअसे निर्देश पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले.

या विषयांवर झाली चर्चा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषीआरोग्यवनेपर्यटनशिक्षणअवकाळी पावसाने नुकसान झालेले पंचनामेकृषी पंप जोडणीजिल्हा परिषदपोलीस विभाग व इतर सर्व विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आलातसेच फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे व इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणेजिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत खर्चास मान्यता देणेसन 2025 -26 अंतर्गत खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००००००

No comments:

Post a Comment