Thursday, 3 July 2025

सर्वांच्या सहकार्याने सण उत्सव शांततेत पार पाडू या!



 

सर्वांच्या सहकार्याने सण उत्सव शांततेत पार पाडू या!

Ø अपर जिल्हाधिका-यांचे जिल्हा शांतता समितीमध्ये आवाहन

            चंद्रपूरदि. 3 : आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात होणार आहेया दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहेअसे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी केले.

            नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होतेयावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेसहायक पोलिस अधिक्षक नियोमी साटममनपा आयुक्त विपीन पालीवालउपमुख्‍ कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे उपस्थित होते.

            प्रत्येकच नागरिक हा विना वर्दीतील पोलिस आहेअसे सांगून अपर जिल्हाधिकारी श्रीव्यवहारे म्हणालेसर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवावीसोशल मिडीयावर येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नयेमोहर्रम आणि एकादशी एकत्रित येत असून ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना  योग्य निर्देश द्यावेतमोकाट जनावरेरस्त्यावरील खड्डे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थासाबाविभागाने विशेष देणे गरजेचे आहेसण उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडीत सुरू राहीलयाची महाविरतण कंपनीने काळजी घ्यावीया कालावधीत मद्यविक्रीचा साठा अचानक वाढणार नाहीयासाठी उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करावीप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियेाजन करावेतसेच आरोग्य विभागाने फिरते वैद्यकीय पथकपुरेसा औषधीसाठी ठेवावाअशा सुचना त्यांनी दिल्या.

अफवांबाबत सर्वांनी अलर्ट राहावे : अतिरिक्त पोलिस अधिक्षक कातकाडे

सोशल मिडीयाबाबत सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेकृत्रिम बुध्दिमत्तेच्या माध्यमातून आजकाल बनावट पोस्ट करणे शक्य असून, असे आढळल्यास त्वरीत सायबर पोलिस स्टेशनसोबत संपर्क करावाशांतता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहेसण आणि उत्सवादरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईलध्वनी प्रदुषणाबाबत डीजे ऑपरेटर्सची बैठक घेऊन मर्यादेचे पालन करण्याचे त्यांना सांगितले जाईलउल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईलचंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पडतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केलेतसेच शांतता समितीच्या उपस्थित सदस्यांनी सुचना केल्याकार्यक्रमाचे संचालन मंगला घागी यांनी केलेबैठकीला उपविभागीय अधिकारीतहसीलदारउपविभागीय पोलिस अधिकारीमुख्याधिकारीपोलिस पाटील आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment