Saturday, 12 July 2025

‘साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर


 साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर

चंद्रपूरदि. 12 : निराश्रीत बालकांना ओळख आणि प्रतिष्ठात्यांची आधार नोंदणीबालकांचे कायदेशीर सक्षमीकरण आणि शाळाबाह्य गरीब वस्तीत राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले प्राथ व उच्च प्राथ शाळाचंद्रपूर येथे आधार कार्ड शिबीर घेण्यात आले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून महिला बालकल्याण विभागजिल्हा बाल संरक्षण कक्षअसेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रनजस्ट राईट फॉर चिल्ड्रेन  प्रोजेक्ट,  हृदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या प्रभारी सचिव ए.  झेड. खान तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे,  जिल्हा परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडेअजय साखरकरमुख्याध्यापिका भारती पाजणकरक्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे उपस्थित होते.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे मत खान मॅडम यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनीही मार्गदर्शन करतानाशासन तुमच्या सदैव पाठीशी राहील. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करून बालकांना शाळेत विशेष प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा,  असे प्रतिपादन केले. यावेळी न्यायाधीश खान व महिला बल विकास अधिकारी भस्मे यांच्या समक्ष शाळेतील तक्रार पेटी उघडण्यात आली. 

निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण करण्याचे काम " साथी अभियान " अंतर्गत सुरू आहे. यावेळी प्रकाश नगरअष्टभुजा वॉर्डातील मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले.  सदर साथी अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वस्त्यांमध्ये सामाजिक सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त बालकांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन  शशिकांत मोकाशे यांनी केले तर आभार मारोती दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला संध्या तोगरअजय पवारमारोती कोसेविवेक चिमूरकरराणी मेश्रामरश्मी भोयर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा प्रशासनाचा विशेष सहभाग लाभला.

00000

No comments:

Post a Comment