Monday, 4 August 2025

27 अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

 



27 अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

Ø महसूल सप्ताहानिमित्त 161 जणांची आरोग्य तपासणी

चंद्रपूरदि. 4 : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावीशासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावायासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ते ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेतया अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयउपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय चंद्रपूरच्या वतीने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 27 अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केलेतसेच आरोग्य तपासणी शिबिरात 161 लाभार्थ्यांनी विविध तपासणीचा लाभ घेतलाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी कोमल मुनेश्वर व त्यांचे चमूचे सहकार्य लाभले.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी संजय पवार, रवींद्र माने, उपजिल्हाधिकारी संजय पवारशुभम दांडेकरअतुल जटाळेतहसीलदार विजय पवारअधीक्षक नरेश बहिरम आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment