Friday, 29 August 2025

शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात


शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 29 : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सन 2025-26 पासून कृषि समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहेजिल्ह्यासाठी या योजनेत एकूण 145 कोटींची तरतूद करण्यात आली असूनयामध्ये 129.07 कोटी प्रचलित योजनांसाठी तर 16.13 कोटी स्थानिक गरजांनुसार तयार होणाऱ्या योजनांसाठी उपलब्ध होणार आहेत.

ही योजना भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणेउत्पादन खर्च कमी करणेउत्पादकता वाढविणेपिकांचे विविधीकरण करणेमूल्य साखळी बळकट करणेहवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देणे, अशा अनेक उद्दिष्टांसाठी राबविली जाणार आहेसूक्ष्म सिंचनहवामान अनुकूल बियाणेजमिनीची सुपीकता व्यवस्थापनकमी खर्चिक यांत्रिकीकरणडिजीटल व काटेकोर शेतीकृषी हवामान सल्लागोदाम व लॉजिस्टिक्सप्रक्रिया व निर्यात या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीतून होणारी खर्च बचत ही कृषि समृद्धी योजनेसाठी वापरली जाणार आहेमंत्रिमंडळाच्या 29 एप्रिल 2025 च्या बैठकीत राज्यासाठी पुढील पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटीअसे एकूण 25 हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीबाबतची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जीसीयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीजिल्ह्यातील स्थानिक गरजासंसाधने आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तालुकानिहाय योजना तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश घायगुडेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकराव तोटावारकृषि उपसंचालक चंद्रकांत ठाकरेकृषि विकास अधिकारी विरेंद्र राजपूतजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉप्रमोद जल्लेवारसहाय्यक निबंधक एलआरवानखेडेतंत्र अधिकारी मेघा ताटीकुंडलवार तसेच कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment