Friday, 19 September 2025

जिल्हा बालस्नेही करण्यासाठी तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण

 जिल्हा बालस्नेही करण्यासाठी तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण

चंद्रपूरदि.19 :  जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जीसी यांच्या मार्गदर्शनामध्ये व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा बालस्नेही करण्यासाठी सर्व तालुक्यातील बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

15 ही तालुक्यात आयोजित या प्रशिक्षणाला ग्राम बाल संरक्षण  समितीच्या सचिवअंगणवाडी सेविकाबालविकास प्रकल्प अधिकारीसुपरवायजरपोलिस विभागशिक्षकपोलिस पाटीलग्रामसेवक यांनी उपस्थित होतेबाल संरक्षण समिती संरचनाकर्तव्य व जिल्हा माहिला व बालविकास कार्यालय अंतर्गत योजनांची प्रचार प्रसिद्धी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यात मिशन वात्सल्य योजनाचाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, जिल्हा बाल संरक्षण कक्षसखी वन स्टॉप सेंटर योजनाअनाथ प्रमाणपत्र योजनादत्तक प्रकियाबालसंगोपन योजनाकौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, पोक्सो कायदा 2012, बालविवाह कायदा 2006, महिला सक्षमीकरण केंद्रबेटी बचाओ बेटी पढाओकामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण कायदा आदी विषयांचा समावेश होता.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडेश्रीमहाकाळकरअतिशकुमार चव्हाणविधी अधिकारी अनिल तानलेजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरजिल्हा समन्वयक अभिषेक मोहर्लेशशिकांत मोकाशेश्याम मोदिलवारआर्यन लोणारेपरविन शेख आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment