Wednesday, 24 September 2025

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी













 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Ø बांधावर जाऊन पिडीत शेतक-यांसोबत संवाद

चंद्रपूरदि. 24 : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाचीराज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी आज (दि.24) बांधावर जाऊन पाहणी केली व शेतक-यांसोबत संवाद साधलायावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल होते.

चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणीवाहनगाव येथील बालाजी जुगनाकेबोथली येथील नितीन खापणेखामगाव येथील शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील प्रफुल्ल सोनकरभेंडाळा येथील संजय उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेतात जावून बाधित शेतमालाची पाहणी केली.

पालकमंत्री डॉउईके म्हणालेआज या परिसरात नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करताना जाणवले कीअतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहीलपंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ शासनास पाठवला जाईलपिडीत शेतक-यांना जास्तीत जास्त अनुदान कसे मिळवून देता येईलयासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणालेविदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहेसोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागात कटाईला सुद्धा परवडणार नाहीअशी सोयाबीनची परिस्थिती आहेगत महिन्याच्या भरपाईचा निर्णय शासनस्तरावर झाला आहेसप्टेंबर महिन्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहेसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून नुकसानीचा सर्व अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहेअसे ते म्हणाले.

चिमूर तालुक्यात पाहणी दरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडियाजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉसंतोष थीटेउपविभागीय अधिकारी किशोर घाडगेतहसीलदार श्रीधर राजमानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होतेतर वरोरा तालुक्यातील गावांच्या पाहणी दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकरआमदार करण देवतळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहउपविभागीय अधिकारी अतुल जटाळेतहसीलदार योगेश कौटकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

चिमूर आणि वरोरा तालुक्यातील नुकसान : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात बाधित क्षेत्र 3017.53 हेक्टर असून बाधित शेतक-यांची एकूण संख्या 3418 आहेतर वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र 592.25 हेक्टर आणि शेतकरी संख्या 1408 आहे.

००००००

No comments:

Post a Comment