Thursday, 25 September 2025

पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळावा

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळावा

Ø 30 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे आयोजन

चंद्रपूरदि. 25 :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडल करिअर सेंटर आणि इंदिरा गांधी महिला महाविद्यालयघुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वीआयटीआयपदविकापदवी इत्यादी महिला उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नौकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेसदर रोजगार मेळाव्यातून 700 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेजिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करावीतसेच महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.लातडवीयांनी केले आहे.

या नामांकित कंपन्यांचा सहभाग : या मेळाव्यात 1. ओमॅट वेस्ट प्रा.लिचंद्रपूर, 2. राघव फूड्सप्रालिचंद्रपूर, 3. मल्टी ऑरगॅनिक प्रालिचंद्रपूर 4. वैभव  इंटरप्रायझेसनागपूर, 5. विदर्भ क्लिक वन सोल्युशनचंद्रपूर, 6.. संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि.चंद्रपुर 7.एस.बी.आयलाईफ प्रा.लिचंद्रपूर 8.एलआयसी ऑफ इंडियाचंद्रपूर इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त  पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.

येथे करा संपर्क : मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती ) उपस्थित राहावेअधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपुर दूरध्वनी क्रमांक 07172-252295  येथे संपर्क करावा.

००००००

No comments:

Post a Comment